पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिंदेंपेक्षा राष्ट्रवादी मला अधिक कळते: शरद पवार

शरद पवार, सुशीलकुमार शिंदे

काँग्रेस-राष्ट्रवादी आज वेगळे असले तरी उद्या पुन्हा एकत्र येण्याचा विचार करतील, असे सूचक वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याचे खंडन केले आहे. शिंदे यांच्यापेक्षा राष्ट्रवादी मला अधिक कळते. शिंदे त्यांच्या पक्षाविषयी बोलले असतील. मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे. त्यांच्यापेक्षा मला निश्चितच राष्ट्रवादीबद्दल अधिक माहिती आहे. तसेच मी थकलेला नाही त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला काहीच अर्थ नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. ते जळगाव येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

स्वतः थकल्यामुळेच सुशीलकुमार शिंदेंचं 'ते' वक्तव्यः अजित पवार

दरम्यान, आपल्या वक्तव्यावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्यानंतर शिंदे यांनी बुधवारी घुमजाव केले. शरद पवार वयाच्या ८० व्या वर्षीही प्रचार करत असल्याचा संदर्भ देऊन मी ते थकल्याचा उल्लेख केला होता. पण, माध्यमांनी व विरोधकांनी त्याचा विपर्यास केला. मी कार्यकर्त्यांची भाषा बोललो. दोन्ही पक्षांना एकत्र यावे लागेल. आपण एकत्र आलो तर विरोधकांची आपल्यासमोर उभे राहण्याची हिंमतही होणार नाही,' असे मी म्हणालो होतो,' असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले.

शेतकरी उगीच आत्महत्या करत नाहीत, शरद पवार यांचे सूचक वक्तव्य

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र शिंदे हे स्वतः थकले असल्याने, त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केले असल्याचे म्हटले. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधी पण, थकणार नसल्याचेही अजित पवार यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले होते.

काँग्रेस पक्ष स्वतःची ओळख विसरलाय, राधाकृष्ण विखेंची टीका

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 i very well know ncp than sushil kumar shinde says sharad pawar