राज्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत हे आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित 'तरुण भारत' वृत्तपत्रात संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली आहे. यावर राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपण सामनाशिवाय दुसरे वृत्तपत्र वाचत नसल्याचे सांगितले. 'तरुण भारत' नावाचे वृत्तपत्र आहे, हेच माझ्या लक्षात नव्हते असा टोला त्यांनी लगावला.
मॅकडोनाल्डच्या CEO ची हकालपट्टी, कर्मचाऱ्याशी संबंध भोवले
राज्यात एकीकडे सत्ता स्थापण्यासाठी रणकंदन सुरु असतानाच संजय राऊत हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्यामुळे सर्वांचेच लक्ष तिकडे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, राज्यपाल कोश्यारी यांच्याशी आमचे जुने संबंध आहेत. त्यांना प्रचंड अनुभव आहे. ते मुख्यमंत्री होते. संसदेच्या दोन्ही सभागृहाचा त्यांना चांगला अनुभव आहे. वेळोवेळी यापूर्वीही आम्ही त्यांचे मार्गदर्शन घेतले आहे. आज त्यांना भेटून त्यांचे आशीर्वीद घेणार असून आमची भूमिकाही त्यांना सांगणार आहोत. ही राजकीय भेट नसून सदिच्छा भेट आहे.
गुंडांचा वापर आम्ही कुठं केला ते संजय राऊत यांनी सांगावेः गिरीश महाजन
'तरुण भारत' दैनिकातून संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली आहे. याबाबत राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री 'सामना' वाचत नाही. त्याप्रमाणेच मीही 'सामना'शिवाय काहीच वाचत नाही. 'तरुण भारत' नावाचे वृत्तपत्र आहे हेच मी विसरलो होतो.