पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...तरीही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

निवडणुका संपल्या, निकाल लागला..महायुतीला बहुमतही मिळाले आहे. पण सत्तेतील वाट्यावरुन अजून भाजप-शिवसेनेचे एकमत होताना दिसत नाहीये. येत्या ९ नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपुष्टात येणार आहे. त्यातच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ७ नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन झाली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असा अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला इशारा दिला आहे. पण खरंच सरकार स्थापन नाही झाले तर राष्ट्रपती राजवट लागू होईल का ? हा खरा प्रश्न आहे. नवे सरकार अस्तित्वात आलेच पाहिजे अशी कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्याने सरकार स्थापण्यास विलंब लागला तरी कोणताही कायदेशीर पेच निर्माण होणार नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. 

'तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करा, दखल न घेतल्यास आंदोलन करू'

नवे सरकार १० नोव्हेंबरपर्यंत सत्तेत येणे कायदेशीरदृष्ट्या सत्तेत येणे बंधनकारक नाही. विधानसभा संपुष्टात येईपर्यंत नवे सरकार स्थापन झाले नाही तरीही कोणताही कायदेशीर पेच निर्माण होत नाही, असे सांगितले जाते. यापूर्वीही २००९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या खातेवाटपावरुन मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळे त्यावेळीही सरकार स्थापन करण्यास उशीर झाला होता. त्यावेळी राज्यपालांना यात हस्तक्षेप करावा लागला होता.

'भाजप-शिवसेनेच्या सत्तानाट्यामध्ये काँग्रेसने पडू नये'

दरम्यान, शिवसेना ही ५०-५० फॉर्म्युलावर ठाम असून भाजपने दिलेल्या शब्दाला जागण्याची भाषा ते बोलत आहेत. तर भाजप शिवसेनेला महत्त्वाची पदे देण्यास तयार नाही. त्यामुळे दिवसेंदिवस हा वाद चिघळतच चालला आहे. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला ऊत आला आहे. तरीही येत्या एक-दोन दिवसांत महायुतीमध्ये यावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

सेनेचं दबावतंत्र, संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट