मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचा निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शनिवारी दिला. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख आणि अपक्ष उमेदवार प्रशांत पवार यांनी आक्षेप घेतला होता. मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर जुन्या तारखेचा शिक्का असल्याचे सांगत त्यांनी हा आक्षेप नोंदवला होता.
भाजपचे जगदीश मुळीक पुण्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार, १४७ कोटींचे
याप्रकरणातील सुनावणीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पूर्ण केली. यासंदर्भात ते काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर नोटरीचा कालावधी वाढवल्याचा निर्वाळा देत त्यांचा अर्ज वैध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. निकाल ऐकण्यासाठी नागपूर तहसिल कार्यालयाबाहेर विरोधकांनी मोठी गर्दी केली होती.