पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वंचितच्या उमेदवाराचा सायकलवरुन प्रचार

हडपसर मतदार संघातील वंचितच्या उमेदवाराने सायकलवरुन प्रचाराला सुरुवात केली

हडपसर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार घनश्याम (बापू) हाक्के यांनी शनिवारी प्रचाराचा नारळ फोडला. विशेष म्हणजे त्यांनी चक्क सायकलवरुन प्रचाराला सुरवात करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मतदार संघातील प्रदुषणाकडे लक्ष वेधण्यासाठी सायकलवरुन प्रचाराला सुरुवात केल्याचे घनश्याम हाक्के यांनी म्हटले आहे. 

जम्मू-काश्मीरः श्रीनगरमधील लाल चौकाजवळ ग्रेनेड हल्ला

ते म्हणाले की, हडपसरवासीयांना कायमच विविध समस्यानां सामोरे जावे लागते. कचरा डेपो याच भागात, नगर रोड, सोलापूर रोड ,मुंबईरोड सारे महामार्ग येथूनच जातात. त्यामुळेच येथील रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दिवसेंदिवस प्रदुषणात भर पडत आहे. याच गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी सायकलवरुन  प्रचाराला सुरुवात केली. शहर परिसरात प्रदुषण हा मुख्य मुद्दा आहे. मात्र मंत्री, महापौर, आमदार यांनी या प्रश्नाला गांभिर्याने घेतलेले नाही, असेही ते यावेळी म्हणाले.  

सलग १४ वेळा निवडून आलेला 'माय का लाल दाखवा', पवारांचे आव्हान

मगरपट्टा सिटी ,अमोनोरा पार्क ,माळवाडी ,हडपसर गावठाण येथील नागरिकांशी संवाद साधला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनंतर भाजपा शिवसेनेने देखील जनतेची फसवणूकच केली आहे. त्यामुळे हडपसरचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर वंचित आघाडीला संधी द्या, असे आवाहन त्यांनी स्थानिकांना दिले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 hadapsar consultancy vanchit bahujan aghadi candidate rally on cycle