पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात राज ठाकरेंच्या सभेला जागा मिळेना

राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुण्यात प्रचार सभा घेण्यासाठी मैदान उपलब्ध होत नसल्याचे समोर आले आहे. राज ठाकरे हे येत्या ९ ऑक्टोबरला पुण्यात सभा घेऊन मनसेच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. परंतु, त्यांच्या सभेसाठी मैदानच उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे. मनसेकडून आता अलका टॉकिज चौकात सभेला परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

तिकीट कापलेल्या बावनकुळेंना भाजपने असा दिला 'न्याय'

राज ठाकरे यांची सभा कसबा मतदारसंघात होणार आहे. त्यासाठी मनसेने टिळक रोड व शनिवार पेठेतील रमणबाग शाळेकडे परवानगी मागितली होती. मात्र ती नाकारण्यात आली. सरस्वती विद्या मंदिराच्या मैदानासाठीचा अर्ज करण्यात आला होता. मात्र तेही मिळाले नाही. पावसाळ्यामुळे डेक्कन येथे नदीपात्रात सभा घेता येत नाही, असे कळवण्यात आले.

उद्धव ठाकरे नव्हे 'यू-टर्न' ठाकरे म्हणा, धनंजय मुंडेंचा टोला

दरम्यान, मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे म्हणाले की, आम्ही शैक्षणिक संस्था आणि मैदान आहेत. तिथे एक तारखेपासून आम्ही परवानगी मागत आहोत. ते आम्हाला सभा घ्या, असे म्हणत आहेत. पण ते लेखी द्यायला तयार नाहीत. पण प्रशासनाला ना-हरकत प्रमाणपत्र पाहिजे. मैदान देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपचे जगदीश मुळीक पुण्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार, १४७ कोटींचे धनी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 grounds not available in pune for mns chief raj thackerays rallies