पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्या चित्र स्पष्ट होईल आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार- संजय राऊत

संजय राऊत (ANI)

उद्या (गुरुवार) चित्र स्पष्ट होईल आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार स्थापन होईल, असा विश्वास शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी व्यक्त केला. दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीवरही त्यांनी भाष्य केले. पंतप्रधानांना एखादा नेता भेटला तर काहीतरी 'काळंबेरं' आहे असे समजण्याचे कारण नाही असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालीच राज्यात सरकार स्थापन होईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला. 

 

राऊत पुढे म्हणाले की, भाजप सत्ता स्थापण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे बाकी पक्षांकडून प्रयत्न सुरु आहे. शिवसेनेसमोरची सत्ता स्थापनेबाबतची विघ्ने दूर झाली आहेत. उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या आत शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. राज्यपालांकडे बहुमताचा आकडा घेऊन जाऊ. येत्या ५ ते ६ दिवसांत सत्ता स्थापण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. 

शरद पवार हे राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेल्या नुकसानीबाबत पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळावी यासाठी ते भेट घेत आहेत. दोघांच्या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करु नका, असेही त्यांनी सांगितले. 

राज्याला अतिरिक्त निधी मिळावा यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 government will be formed in Maharashtra before December says shiv sena mp sanjay raut