पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गोपीचंद पडळकरांची घरवापसी, काशिराम पवार यांचाही भाजप प्रवेश

गोपीचंद पडळकरांची घरवापसी, काशिराम पवार यांचाही भाजप प्रवेश

धनगर समाजाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते गोपीचंद पडळकर आणि आमदार काशिराम पावरा यांनी आज भाजपत प्रवेश केला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे सहा आमदार आज भाजपत दाखल होणार असल्याची माध्यमांत चर्चा सुरु होती. पण केवळ दोघांनीच आज प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी येत्या दोन दिवसांत आणखी एक मेगाभरती होणार असल्याचे कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितले. त्यामुळे पक्षांतरासाठी चर्चेत असलेल्या संभाव्य आमदारांपैकी काहीजण भाजपत येण्याची शक्यता आहे.

नमिता मुंदडांचा राष्ट्रवादीला रामराम; भाजपमध्ये केला प्रवेश

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शिरपूरचे काँग्रेसचे आमदार अमरिश पटेल यांना भाजपत आणण्याचा प्रयत्न सुरु असून ते लवकरच पक्षात येतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच आज पटेल यांचे समर्थक पावरा यांचा भाजप प्रवेश होत असल्याचे त्यांनी सांगितले. हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील गरवारे क्लबमध्ये झाला

'आप'ची दुसरी यादी जाहीर, पु्ण्यातील दोन उमेदवारांचाही समावेश

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून लढलेले पडळकर यांची भाजपत घरवापसी झाली आहे. भाजपमधून वंचित आघाडीत गेलेले पडळकर अखेर भाजपत परत आले आहेत. त्यामुळे धनगर समाजाची मते मिळवण्यात पक्षाला यश येईल, असा विश्वास भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 gopichand padalkar and congress mla kashiram pawara joins bjp