पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वारं फिरलंय, पण महायुती म्हणते आमचं ठरलंय !

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार

आक्रमक प्रचाराची रणनीती वापरत भाजपने 'अब की पार २२० के पार' असे म्हणत एकहाती सत्ता मिळवण्याचे ध्येय अवलंबले होते. प्रचारात स्थानिक मुद्द्यांपेक्षा कलम ३७० आणि सर्जिकल स्ट्राईकसारख्या भावनिक मुद्यांना हात घातला. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचारसभांचा धडाका लावला. विरोधी पक्षामध्ये यंदा राष्ट्रवादीने प्रचारात आक्रमकता दाखवली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वयाच्या ८० व्या वर्षीही एकहाती प्रचार यंत्रणा राबवली. त्यांची सातारा जिल्ह्यातील पावसातील प्रचारसभा प्रचंड गाजली. सोशल मीडियावर त्यांचे भाषण प्रचंड व्हायरल झाले. त्यावेळी 'वारं फिरलंय' हे वाक्य प्रचंड गाजले. महायुतीने जरी हे मान्य केले नसले तरी निकालात त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. भाजप-सेनाच्या जागा कमी होण्यामागे बंडखोरीचे प्रमुख कारण सांगितले जात आहे. तर विरोधकांकडून सरकारचा उन्माद त्यांच्या जागा कमी होण्यामागचे प्रमुख कारण मानले. 

सध्यस्थितीत भाजप १०३ जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. तर ५७ जागांसह शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादीला ५३ आणि काँग्रेसला ४६ जागा मिळाल्या आहेत. मनसेला १ आणि इतरांना २८ जागा मिळाल्या आहेत. या जागांमध्ये एखाद-दुसरी वाढ किंवा घट होऊ शकते. दरम्यान, विजयानंतरच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे सरकार सत्तेवर येणार असून 'आमचं ठरलंय' त्याप्रमाणे होणार असल्याचे सांगितले. पण त्यांनी काय ठरले आहे हे मात्र गुलदस्त्यातच ठेवले. 

विधानसभा निवडणुकीसंबंधीच्या महत्त्वाच्या बातम्या खालील बघू शकता..

जनतेला सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाहीः शरद पवार

 

Analysis : भरवशाच्या म्हशीला टोणगा... आणि म्हैसही!

 

सत्ता स्थापनेची घाई नाही, सर्व पर्याय खुले, उद्धव यांचे दबावतंत्र

 

'या' विद्यमान मंत्र्यांचा झाला पराभव

 

१५ अपक्ष आमच्यासोबत: मुख्यमंत्री

 

आमचे डोळे उघडणारा जनादेशः उद्धव ठाकरे

 

एक नव्हे दोन चंद्रकात पाटील विधानसभेत

 

assembly election results 2019 : विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

 

वरळीत आदित्य ठाकरेंनी भगवा फडकावला

 

धाकधुकीनंतर प्रणिती शिंदे यांना गड राखण्यात यश!

 

साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा न ठेवणाऱ्यांचा पराभव, पवारांचा उदयनराजेंना टोला

 

अखेर चंद्रकांत पाटील कोथरूडमधून विधानसभेत

 

मातोश्रीच्या अंगणात महापौरांचाच पराभव

 

साताऱ्यात उदयनराजे भोसलेंचा पराभव, मतदारांची नाराजी निवडणुकीतून उघड

 

रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधवांचा पराभव

 

बारामतीमधून अजित पवारांचा सहज विजय

 

धनं'जय' भाऊच ठरले भारी, पंकजा मुंडेंची हॅट्ट्रिक हुकली! 

 

पक्ष बदलला अन् वेळही! कमळाच्या चिन्हांवर नमिता मुंदडा विजयी

 

मनसेला एका जागेवर यश, कल्याण ग्रामीणमधून प्रमोद पाटील विजयी

 

मोदींनी एकाच दिवशी दोन उमेदवारांसाठी सभा घेतल्या आणि दोन्ही पडले!

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 gist of election result of all parties bjp shiv sena ncp congress