बोगस मतदारांवरुन बीडमध्ये क्षीरसागर गटात जुंपली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे काका आणि प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्यावर बोगस मतदानासाठी त्यांच्या महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. जयदत्त क्षीरसागर हे त्यांच्या महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना बोगस मतदानासाठी आणत असल्याचा आरोप संदीप यांनी केला आहे. तर जयदत्त क्षीरसागर यांनी हे आरोप फेटाळाले असून दोषी असणाऱ्यांवर निवडणूक आयोग कारवाई करेल, असे स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणूक एक्झिट पोल
महाराष्ट्र
संस्था | भाजप-शिवसेना | कांग्रेस-राष्ट्रवादी | अन्य |
---|---|---|---|
एबीपी-सी व्होटर | 192-216 | 55-81 | 4-21 |
टाइम्स नाऊ | 230 | 48 | 10 |
इंडिया टुडे | 166-194 | 72-90 | 22-32 |
हरियाणा
संस्था | भाजप | कांग्रेस | अन्य |
---|---|---|---|
सीएनएन-न्यूज १८ | 75 | 10 | 5 |
टाइम्स नाऊ | 71 | 10-12 | 5-7 |
न्यूजेक्स-पोलस्ट्रॅट | 75-80 | 9-12 | 4 |
संदीप क्षीरसागर यांनी दोन दिवसांपूर्वी जयदत्त क्षीरसागर गटाकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बीडमधील एका केंद्रावर एका गाडीत काही लोक आणण्यात आले होते. त्यांच्याबाबत संशय आल्यानंतर त्यांची चौकशी केली असता ते सर्वजण बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील असल्याचे संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांना समजले. सध्या पती-पत्नी अशा दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असून या गोंधळात वाहनाच्या चालकासह १० ते १५ लोक तेथून पसार झाल्याचा दावा संदीप क्षीरसागर यांनी केला आहे.
अमरावतीत स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारावर हल्ला; गाडी पेटवली
याबाबत संदीप क्षीरसागर म्हणाले की, दोन वाहनांमधून पाटोद्याहून या लोकांना आणण्यात आले होते. जेव्हा मतदान केंद्रावर एमएच १६ पासिंगचे वाहने आल्याचे आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी त्यांचे मतदान ओळखपत्र पाहिले. त्यावेळी प्रत्यक्षात असलेल्या व्यक्ती आणि ओळखपत्रावरील छायाचित्र यात फरक असल्याचे जाणवले. काही लोकांना ताब्यात घेऊन आम्ही जाब विचारला असता त्यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या महाविद्यालायातील कर्मचारी असल्याचे सांगितले. या दोघांच्या चौकशीदरम्यान या दाम्पत्यांबरोबर असलेले इतर लोक पसार झाले. याबाबत पोलिस आणि प्रशासनाला कळवले आहे. दोघांनाही शिवाजी नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जर या दोघांचे नाव पाटोदा आणि बीड मतदारसंघातील असेल तर ते गैर असल्याचेही ते म्हणाले. याबाबत निवडणूक आयोगाकडे रितसर तक्रार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
करमाळा मतदारसंघातील मतदान केंद्रावर दोन गटांत हाणामारी
तर दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले, ज्यांची नावे मतदार यादीत आहेत. पण ते शहराबाहेर राहतात ते मतदानासाठी आले असतील. त्यांच्याकडे ओळखपत्र आहे. त्यांना मतदान करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. ते कर्मचारी माझ्या संस्थेतील आहेत, हा त्यांचा गुन्हा नाही. चुकीचे असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी.