पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस सावरकर विरोधी नाही : मनमोहन सिंग

डॉ. मनमोहन सिंग

राज्यातील विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मनमोहन सिंग यांनी वीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासंदर्भातील मुद्यावर भाष्य केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात पोस्टल तिकीटावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र छापण्यात आले होते, असा दाखला देत त्यांनी काँग्रेस सावरकर विरोधी नसल्याचे सांगितले. भारतरत्न पुरस्कारासंदर्भातील निर्णय हा एका समितीकडून घेतला जातो, असा उल्लेखही त्यांनी केला. 

काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकांना गाळात घातले, उदयनराजे कडाडले

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने घोषणापत्र जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाची भारतरत्न पुरस्कारासाठी केंद्राकडे शिफारस करणार असल्याची घोषणा केली होती. भाजपच्या या भूमिकेनंतर काँग्रेस प्रवक्ता मनिष तिवारी यांनी पत्रकार परिषद बोलवून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाची शिफारस करण्याच्या भूमिकेला विरोध दर्शवला होता. सावरकरांना भारतरत्न दिल्यानंतर नथूराम गोडसेलाही भारतरत्न देणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.   

'आधी स्वतःचे अपयश पाहा मग आमच्यावर टीका करा'

काँग्रेस पक्षासारखे दशभक्ती इतर कोणत्याही पक्षात नाही, असा टोलाही मनमोहन सिंग यांनी यावेळी लगावला. स्वातंत्र्य लढ्यात भाजप, आरएसएसचे नाव देखील नव्हते, असे सांगत देशभक्तीसाठी प्रशस्तीपत्राची गरज नसते, असे ते म्हणाले. कलम ३७० विषयी देखील त्यांनी आपली भूमिका मांडली. काँग्रेसने ३७० च्या बाजूने मतदान केले. आमचा आक्षेप हा जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० लागू करण्याच्या पद्धतीला होता, असे मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 former pm manmohan singh on veer savarkar for bharat ratna