शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कोणतीही बैठक झाली नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत करून खळबळ उडवून दिली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असली तरी कुणासोबत सरकार स्थापन करण्याबाबत आम्ही कोणतीही चर्चा केलेली नाही. आम्ही अद्याप सरकार स्थापनेसाठी कोणासोबत जाण्याचा निर्णय घेतला नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे मागील दोन आठवड्यांपासून काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेत बैठका कशासाठी होत आहेत? शरद पवारांनी असे वक्तव्य का केले असेल, शिवसेनेबरोबर काँग्रेस-राष्ट्रवादीचे संयुक्त सरकार स्थापन होईल का ? असे एक ना अनेक प्रश्न सामान्यांना पडले आहेत.
आपापसातील भांडणात दोघांचेही नुकसान, भागवतांचे सूचक वक्तव्य
राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठका सुरु आहेत. मागील आठवड्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनीही सरकार स्थापण्यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी किमान समान कार्यक्रम निश्चित करुन सरकार स्थापण्याबाबत पुढील निर्णय घेईल असे राष्ट्रवादीबरोबरील संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र, शरद पवारांनी सोमवारी दिल्लीत केलेले वक्तव्य कशाचे द्योतक आहे, असा सवाल केला जात आहे.
स्मृती इराणी... इन्स्टाग्राम पोस्ट... आणि लक्षवेधक कॅप्शन
सोशल मीडियावरही शरद पवारांच्या दिल्लीतील वक्तव्यावर प्रतिकूल प्रतिक्रिया आल्याचे दिसून आले. पवारांनी अशी भूमिका का घेतली असेल यावरही चर्चा रंगल्या आहेत. यामागे अनेक शक्यता वर्तवण्यात येत आहेत. काही शक्यता पुढीलप्रमाणे असू शकतात..
१. येत्या काही दिवसांत झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक आणि कर्नाटकमध्ये विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेसोबत गेल्यास त्यातून निवडणूक असलेल्या राज्यात चुकीचा संदेश जाईल, अशी शक्यता असल्याने काँग्रेसकडून 'थोडं थांबा' असे सांगितले गेले असेल. त्यामुळे शरद पवारांनी असे वक्तव्य केले असेल.
गांधी कुटुंबियांची SPG सुरक्षा काढण्यावरून काँग्रेस आक्रमक
२. अशा प्रकारची वक्तव्ये करुन शिवसेनेवर आणखी दबाव निर्माण करण्याचाही प्रयत्न असू शकतो. शिवसेनेकडून अधिकाधिक मंत्रिपदे किंवा इतर पदे घेण्यासाठी केलेली ही राजकीय खेळी असू शकते, असे काही राजकीय विश्लेषकांना वाटते.
३. सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आपले विचार बाजूला ठेवून शिवसेनेशी हातमिळवणी केल्याचा संदेश जनतेला जाऊ नये. तसेच आम्हाला सत्तेची हाव नाही, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे कदाचित वेळ घेतला जात असेल किंवा अशाप्रकारची वक्तव्ये केली जात असतील. किंवा जनतेतून संभाव्य आघाडीबाबत काय मत येते हे जाणून घेण्याचाही प्रयत्न असू शकतो.
दिल्लीतील काँग्रेस-राष्ट्रवादीची आजची बैठक रद्द
४. शरद पवार यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत मित्रपक्षांचा उल्लेख केला होता. कदाचित मित्रपक्षांनाही शिवसेनेसोबत जाण्यापूर्वी विश्वासात घेण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. त्याचबरोबर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. पण परिस्थिती अशी निर्माण करायची की, आम्ही विरोधात जरी लढलो असलो तरी लोकहित किंवा शेतकरी हितासाठी एकत्र आलोत असे भासवण्याचाही प्रयत्न असू शकेल.
५. येणारे सरकार हे पाच वर्षे स्थिर राहावे यासाठी किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी वेळ घेतला जात असेल. यात संभाव्य सर्व मुद्द्यांचा समावेश करुन किमान समान कार्यक्रमात नेमकेपणा आणण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे कदाचित तिन्ही पक्षांना वेळ हवा असेल. यासाठी प्रसारमाध्यमांना दूर ठेवण्यासाठीचा हा प्रयत्न असू शकतो.