पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेवर पहिल्यांदाच खोटारडेपणाचा आरोपः उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे (Photo by Satish Bate)

फडणवीस सरकारने गेल्या पाच वर्षांत अचाट कामे केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो. शिवसेनेने साथ देण्याचा शब्द दिला होता, तो पूर्ण केला. त्यामुळेच मागील पाच वर्षे त्यांना काम करता आले, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला. शिवसेना प्रमुखांनी शब्दाला जागण्याची शिकवण दिली होती. पहिल्यांदाच माझ्यावर, शिवसेनेवर खोटेपणाचा आरोप करण्यात आला. शहा आणि कंपनीने आमच्यावर खोटेपणाचे आरोप केले होते. फडणवीसांनी शहांचा संदर्भ घेऊन माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला. मला खोटे ठरवणाऱ्यांशी मी बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी फडणवीसांचा फोन न उचलल्याचे स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस होते म्हणूनच मी गेल्यावेळी पाठिंबा दिला होता - उद्धव

ते पुढे म्हणाले, पदांचे समसमान वाटप असे मुख्यमंत्री म्हणाले होते. 'पद' यामध्ये मुख्यमंत्रिपदही येते. शहांच्या उपस्थितीत अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हा सत्तेचा समसमान वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता. पण गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अमित शहांशी बोलताना त्यांना मुख्यमंत्रिपद पाहिजे असे सांगितले होते. केंद्रातही अमित शहांनी कुठले मंत्रिपद हवे आहे, असे विचारल्यानंतर त्यांना अवजड उद्योग मंत्रिपद सोडून कोणतेही द्या असे म्हटले होते. हो म्हणून त्यांनी पुन्हा अवजड उद्योग खातेच आमच्या गळ्यात मारले. 

मुख्यमंत्रिपदाबाबत फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी याबाबत आत्ताच जाहीर करु नका, नाहीतर मला पक्षात अडचणी येतील. मी योग्य शब्दांत ते जाहीर करेन असे म्हटले. त्यावर मी विश्वास ठेवला. तीच माझी चूक झाली. 

उद्धवजींनी माझे फोन उचलले नाहीत, फडणवीसांचा आरोप

युती ठेवायची, तोडायची हे भाजपच ठरवणार आहे. खोटेपणाचा आरोप मी सहन करु शकत नाही. मी खोटा नाही. भाजप खोटा आहे. भूमिका बदलणारा भाजप आहे. भाजपचे वक्तव्य क्लेशदायक आहे. 

वेळ मारुन नेण्यासाठी ते खोटे बोलले. खोटे बोलण्याची परंपरा शिवसेनेत नाही. नोटाबंदीवेळी '५० दिवस द्या' हे खोटे सर्वांनी पाहिले आहे. 

आम्हाला जागा वाटपात कमी जागा मिळाल्या. याबाबत चंद्रकांत पाटील यांचे ऐकले हा गुन्हा आहे का? मी मोदींवर कधी टीका केली नाही. ज्या उदयनराजेंनी मोदींवर टीका केली, त्यांना पक्षात स्थान देण्यात आले. सातारामधून परस्पर त्यांची उमेदवारी जाहीर केली. हा खोटारडेपणा नाही का. भाजपला मी शत्रू मानत नाही, पण त्यांनी खोटे बोलू नये.

'उद्धव यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेमुळे सत्ता स्थापण्यात खोडा'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 first time someone blame shiv sena as a liar says uddhav thackeray