सोलापूर जिल्ह्यातील करमाळा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर दोन गटांत हाणामारी झाली. करमाळा मतदारसंघातील माढा तालुक्यातील दहिवली गावात दोन गटात तुफान हाणामारी झाली. यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती हाताळली. त्यानंतर मतदान पुन्हा सुरळीत सुरु झाले. ही हाणामारी कोणाकोणात झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिस तपास करत आहेत. हाणामारी प्रकरणातील काहीजणांना टेंभुर्णी पोलिस ठाण्यात आणल्याचे सांगण्यात येते.
'शिवसेना-भाजप युती २२० जागांच्याही पुढे जाईल असे वाटत नाही'
माढा तालुक्यातील काही भाग हा करमाळा मतदारसंघाशी जोडला गेलेला आहे. करमाळा मतदारसंघातून शिवसेनेकडून रश्मी बागल, राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार संजय शिंदे तर विद्यमान शिवसेनेचे आमदार अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांच्या चुरशीची लढत होत आहे. या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.