महाराष्ट्रातील २८८ विधानसभा जागांसाठीच्या एक्झिट पोल्सचा अंदाज समोर आला आहे. टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीला २३० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. या आघाडीला केवळ ४८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. सर्वच एक्झिट पोल्सनुसार महायुतीचेच सरकार कायम राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
संस्था | भाजप-शिवसेना | कांग्रेस-राष्ट्रवादी | अन्य |
---|---|---|---|
एबीपी-सी व्होटर+ | 204 | 69 | 15 |
टाइम्स नाऊ+ | 230 | 48 | 10 |
इंडिया टुडे+ | 166-194 | 72-90 | 22-34 |
हरियाणा
संस्था | भाजप | कांग्रेस | अन्य |
---|---|---|---|
सीएनएन-न्यूज १८ | 75 | 10 | 5 |
टाइम्स नाऊ | 71 | 11 | 8 |
न्यूजेक्स-पोलस्ट्रॅट | 75-80 | 9-12 | 1-4 |
टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला एकूण ५४.२० टक्के मतदान, आघाडीला २९.४० टक्के आणि इतरांना १६.४० टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
Maharashtra Exit Polls: पुन्हा महायुतीकडेच सत्तेचा अंदाज
इंडिया टुडे-माय एक्सिस इंडियाच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला ४५ टक्के मतदान, आघाडीला ३५ टक्के आणि इतरांना २० टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
सीएनएन न्यूज १८-आयपीएसओएस एक्झिट पोलनुसार भाजप-शिवसेना महायुती २४३ जागांवर विजयी होऊ शकतात. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला ४१ तर इतरांना ४ जागा मिळण्याची शक्यता आहे.
एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार २०४ जागा तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ६९ जागा मिळण्याचा अंदाज.
रिपब्लिक-जन की बात नुसार महायुतीला २१६ ते २३० जागा, काँग्रेस-राष्ट्रवादीला ५२ ते ५९ तर इतरांना ८ ते १२ जागा मिळण्याची शक्यता
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वांधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला होता. परंतु, एकट्याने त्यांना सरकार स्थापन करण्यात यश आले नव्हते. निवडणुकीनंतर शिवसेनेशी त्यांना हातमिळवणी करावी लागली होती. यावेळी शिवसेना आणि भाजपने युती करुन निवडणूक ठरवली. त्यामुळे दोन्ही पक्ष मोठ्या बहुमताने निवडणूक जिंकण्याचा दावा करत आहेत.
Maharashtra Election 2019: वेळ संपली, धाकधूक वाढली
अंतर्गत कलहाशी झुंजत असलेल्या काँग्रेस आणि दिग्गज नेत्यांनी पक्षाचा त्याग केल्यामुळे त्रस्त असलेल्या राष्ट्रवादीने आघाडी करुन निवडणूक जिंकली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोर लावला होता. त्यांनी काँग्रेसच्या सहकार्याने राज्यात सत्ताबदल घडवू असा विश्वास व्यक्त केला आहे.