पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

औरंगाबादेत बोगस मतदान? MIM-NCP कार्यकर्त्यांमध्ये राडा

संग्रहित छायाचित्र

राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सोमवारी पार पडली. औरंगाबाद मध्य मतदार संघात बोगस मतदान होत असल्याच्या आरोप प्रत्यारोपातून एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कटकट गेड परिसरात राडा झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी याठिकाणी सौम्य लाठीमार देखील केल्याचे वृत्त आहे. 

महाराष्ट्र

संस्था भाजप-शिवसेना कांग्रेस-राष्ट्रवादी  अन्य
एबीपी-सी व्होटर+ 204 69 15
टाइम्स नाऊ+ 230 48 10
इंडिया टुडे+ 166-194 72-90 22-34

हरियाणा

संस्था भाजप कांग्रेस अन्य
सीएनएन-न्यूज १८ 75 10 5
टाइम्स नाऊ 71 11 8
न्यूजेक्स-पोलस्ट्रॅट 75-80 9-12 1-4

औरंगाबाद मध्य मतदार संघात राष्ट्रवादीकडून कदिर मौलाना आणि एमआयएमचे उमेदवार नासिर सिद्धकी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हे दोन उमेदवार समोरासमोर आल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान जुंपली. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतले आहे.  

शरद पवारांच्या महिला आयोगाला कानपिचक्या

मतदार यादीत नाव नसतानाही बोगस मतदान करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे आवाहन एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिसांना केले आहे. राज्यातील अनेक दिग्गजांचे भविष्य ईव्हीएममध्ये बंद झाले असून २४ तारखेला सत्ता कोणाची येणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.