पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आदित्य ठाकरे यांच्या विरोधातील बिचुकलेंना EC ने धाडली नोटीस

अभिजित बिचुकले आणि आदित्य ठाकरे

बिग बॉस मराठी या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेल्या अभिजीत बिचुकले वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मात्र ऐन प्रचाराच्या धामधूमीत आदित्य ठाकरेंना आव्हान देणाऱ्या अभिजित बिचुकले यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.  निवडणूक आयोगाला दैनदिनी प्रचाराचा हिशोब द्यावा लागतो. तो हिशोब न दिल्याने अभिजीत बिचुकलेंना ही नोटीस बजावण्यात आल्याचे वृत्त आहे. 

कलम ३७० हटवले त्याबद्दल अभिनंदन! पण...

लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाच्या अंतर्गत बिचुकले यांच्यासह वरळी मतदार संघातील अन्य दोन उमेदवारांनाही निवडणूक आयोगाने नोटीस धाडली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम अंतर्गत वरळी येथील तीन उमेदवारांना आज निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली.

'कमळ म्हणजे सक्ती नाही तर विजयाची खात्री'

वरळी विधानसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांनी निश्चित केलेला दैनिक खर्च सादर केलेला नाही. बिचुकले यांच्यासह  यात विश्राम तिडा पाडम आणि महेश पोपट खांडेकर या उमेदवारांचा समावेश आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 election commission issues notice to abhijit bichukale and other two candidate