पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उमेदवारी जाहीर झाली नसतानाही खडसेंनी अर्ज भरला

एकनाथ खडसे

भाजपने १२५ उमेदवारांची आपली पहिली यादी आज जाहीर केली आहे. या यादीत अनेक दिग्गजांना वगळण्यात आले आहे. पक्षाने माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताई नगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेली नाही. परंतु, एकनाथ खडसे यांनी मात्र, उमेदवारी जाहीर झालेली नसतानाही आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे पक्षनेतृत्वाच्या भुवया उंचावलेल्या आहेत. मुहूर्त होता म्हणून आपण अर्ज भरल्याचे खडसे यांनी सांगितले. दरम्यान, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खडसे हे अतिशय चांगले नेते असल्याची प्रतिक्रिया दिली.

आमदार रमेश कदमांना जामीन मंजूर; मोहोळमधून अपक्ष निवडणूक लढवणार

शक्तीप्रदर्शन करत खडसे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या आपली नाराजी प्रकट केली. ४२ वर्षे आपण या मतदारसंघासाठी काम करतोय. गेली ४२ वर्षे मी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले. अनेक प्रलोभने आली. पण कधी पक्षाशी गद्दारी केली नाही. मी कधीच भाजपला सोडले नाही. जर पक्षाशी प्रामाणिक राहणे गुन्हा असेल तर तो मी केला आहे, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली. 

भाजपची १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

यादीची वाट मी पाहतोय. दुसऱ्या यादीत माझे नाव येईल अशी मला अपेक्षा आहे. आतापर्यंत पक्षात सामूहिक निर्णय घेतले जात असत. आता कालाय तस्मे नमः, असा टोलाही त्यांनी लगावला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 eknath khadse file nomination in spite of his name not in first list of bjp