पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ईडी, सीबीआय हे भाजपच्या विजयाचे मजबूत आधारस्तंभः संजय राऊत

संजय राऊत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आपला सहकारी पक्ष भाजपवर निशाणा साधला आहे. 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. सीबीआय, ईडीसारख्या देशातील तपास यंत्रणा या भाजपच्या विजयाचे मजबूत आधारस्तंभ असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. 

नारायण राणेंचं ठरलं, बुधवारी भाजपत प्रवेश करणार ?

महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांच्या बाजूने वक्तव्य केल्यानंतर राऊत यांनी महाराष्ट्र हा सुडाच्या राजकारणाचा बळी असल्याचे म्हटले. महाराष्ट्रातील निवडणूक ही निर्विवाद आणि एकतर्फी होत असताना शिखर बँकेतील घोटाळ्यात शरद पवार यांचे नाव आणून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे करण्यात आले आहे. पवारांवरील ईडीच्या कृतीने ग्रामीण भागातील वातावरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजून झुकले आहे, असे ते म्हणाले.

सीबीआय आणि ईडी हे भाजपच्या विजयाचे दोन मजबूत आधारस्तंभ आहे, आणि आता या स्पर्धेत निवडणूक आयोगानेही उडी घेतली आहे. निवडणूक आयोगाचे आयुक्त अशोक लवासा यांच्या पत्नीच्या मागे प्राप्तीकर विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लावल्याचे उदाहरण राऊत यांनी आपल्या लेखात दिले आहे.

आपलं ठेवायंच झाकून..अन्, धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

महाराष्ट्र सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यासह शरद पवार यांचे नाव आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे त्यांना पाठिंबा दिला होता. 

पवार हे महाराष्ट्रातील एक मोठे नेते आहेत. पवार हे शिखर बँकेचे संचालक नव्हते किंवा त्यांचा बँकेच्या कामकाजात सहभागही नव्हता. त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहे, असे राऊत म्हणाले.

गाफील राहू नका, गद्दारी करु नका; उद्धव यांचा कार्यकर्त्यांना इशारा

संजय राऊत यांनी शनिवारी शरद पवार यांच्या मुंबईतील घरी जाऊन त्यांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 ED CBI strong pillars of BJP victories says sanjay Raut