पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गाफील राहू नका, गद्दारी करु नका; उद्धव यांचा कार्यकर्त्यांना इशारा

आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Photo by Satish Bate)

विधानसभा निवडणुकीसाठी युती होणार असून येत्या एक ते दोन दिवसांत याची घोषणा होईल, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीवर शिक्कामोर्तब केले. त्याचबरोबर गेल्या ५ वर्षांत खूप अनुभव घेतला. त्यामुळे गाफील राहू नका आणि गद्दारीही करायची नाही, असा सज्जड दम त्यांनी शिवसैनिकांना दिला. 

युतीही होणार आणि शिवसेनेचा मुख्यमंत्रीहीः उद्धव ठाकरे

निवडणुकीवेळचा हा काळ माझ्या आयुष्यातील अत्यंत क्लेषकारक असतो. जीवाला जीव देणारी मंडळी उमेदवारी न मिळाल्यामुळे ते सोडून जातात. नंतर त्यांना आपण चुकल्याचे समजते. मग ते पुन्हा माझ्याकडे येतात. त्यामुळे मला बंडखोरी चालणार नाही. जागा वाटप झाल्यानंतर फालतुपणा करायचा नाही. गाफील राहू नका आणि गद्दारी करायची नाही, असा इशाराच त्यांनी शिवसैनिकांना दिला. 

गनिमी कावा हा गनिमांसाठी करायचा असतो. आम्ही दगा देणारी माणसे नाहीत. राष्ट्रवादीत काय चालू आहे, त्याचा आनंद नाही आणि काँग्रेसमध्ये काय सुरु आहे, त्याचाही आनंद नाही. आम्हाला सत्ता जरुर हवी आहे, पण ती जनतेच्या सेवेसाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

'जैसी करनी, वैसी भरनी'; पवारांच्या गृहकलाहावर उद्धव यांचे मार्मिक भाष्य

उद्धव यांनी या मेळाव्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांना आणि सर्व २८८ मतदारसंघातील इच्छुकांना बोलावले होते. त्यांनी आपल्या भाषणात युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 dont rebel in election uddhav thackeray gives warns to party workers