पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यपालांकडून दुजाभाव, भाजपला ७२ तर आम्हाला फक्त २४ तासः संजय राऊत

संजय राऊत (ANI)

शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. एकवेळ विरोधात बसू पण शिवसेनेला ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्रिपद देणार नाही, ५०-५० फॉर्म्युलावर विचार करणार नाही हा भाजपचा अहंकार आहे, अशी टीका राऊत यांनी केला. या द्वेषाच्या आणि अहंकाराच्या राजकारणामुळे ही वेळ आली असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयीही भाष्य केले. राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी आम्हाली फक्त २४ तास दिले आहेत. पण त्यांना भाजपला तब्बल ७२ तासांपेक्षा अधिक वेळ दिली होती. राज्यपालांकडून हा भेदभाव आहे. आम्हाला आणखी थोडा वेळ द्यायची गरज होती. सर्वांना एकत्रित करण्यास थोडा वेळ लागणारच. पण त्यांच्याविरोधात आमची तक्रार नाही. त्यांच्या निर्णयाचा आम्हाला आदर आहे, असेही राऊत यांनी म्हटले. शिवसेना सरकार बनवणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

द्वेषाच्या आणि अहंकाराच्या राजकारणामुळे महाराष्ट्रात ही वेळ आली आहे. याचे शिवसेनेवर खापर फोडणे चुकीचे आहे आहे. भाजपचे निवेदन दुःखद आणि खेदजनक आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा भाजपनेच अपमान केला आहे. विरोधात बसू पण शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देणार नाही या धोरणावरुनच त्यांच्या मनात काय आहे हे लक्षात येते. आता नात्यामध्ये औपचारिकता राहिली आहे, असे म्हणत त्यांनी शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार असल्याचे सूचकपणे सांगितले.  

शिवसेना सदसदविवेकबुद्धीने पाऊल टाकत आहे. सध्या आमचे किमान समान कार्यक्रमावर काम सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 discrimination from governor with shiv sena says sanjay raut