पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव ठाकरे पाच वर्षे झोपले होते का?, अजित पवार यांचा सवाल

अजित पवार आणि उद्धव ठाकरे

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात १० रुपयांमध्ये जेवणाची थाळी देण्याची घोषणा दसरा मेळाव्यात केली. त्यांच्या या घोषणेचा अजित पवार यांनी समाचार घेतला. १० रुपयांमध्ये जेवण देणार, शेतकऱ्यांचे कर्जमाफ करणार, असे उद्धव यांनी म्हटले आहे. मागील पाच वर्षे ते झोपले होते का, असा सवाल त्यांनी केला आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला १७५ जागा मिळणारः अजित पवार

माझे अश्रू हे मगरीचे आहेत की आणखी कशाचे हे तपासायचे काम उद्धव ठाकरे कधीपासून करायला लागले. मी कसा आहे, ते लोकांना माहीत आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील अश्रूवर टीका केली होती. त्यावरुन पवार यांनी उद्धव यांना प्रत्युत्तर दिले. 

निवडणूक कोणाशी लढायची, देवेंद्र फडणवीसांचा सवाल

यावेळी पवार यांनी मनसेला पाठिंबा देण्याबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, आमची काँग्रेससोबत आघाडी आहे. पण भाजप-शिवसेनेला मतविभाजनाचा फायदा मिळू नये म्हणून काही ठिकाणी आम्ही भूमिका घेतली. कोथरुड मतदारसंघ हा त्यापैकीच एक आहे. म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. बुधवारी राज ठाकरे काय बोलतात पाहू आणि गरज पडली तर एकत्रित सभा घेता येतील का यावर लवकरच भूमिका मांडली जाईल, असे त्यांनी म्हटले.

महाराष्ट्र आम्हीच घडवणारः उद्धव ठाकरे

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 Did Uddhav Thackeray sleep for five years ask ncp leader ajit pawar in pune