पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दुपारी नंतर काँग्रेसचा अंतिम निर्णयः मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे (ANI)

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार की नाही हे आता दुपारी चार नंतर स्पष्ट होणार आहे. दिल्लीत सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपली असून दुपारी चार नंतर काँग्रेस माध्यमांना आपला अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापण्याचा मार्ग अजूनही प्रशस्त झाल्याचे दिसत नाही. 

... त्याच्याशी आम्हाला काय घेण-देणं पडलंय?

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत विस्तृत चर्चा झाली. आता महाराष्ट्रातील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना चर्चेसाठी बोलावले आहे. त्यांच्याशी चर्चा करुन दुपारी चार नंतर काँग्रेसचा जो काही निर्णय असेल तो आम्ही कळवू असे खर्गे यांनी माध्यमांना सांगितले. 

शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात शरद पवार यांनी केले महत्त्वाचे

काँग्रेसच्या या निरोपानंतर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपला निर्णय साडेचारनंतर जाहीर करणार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली.

बीडमध्ये ट्रक-कारचा भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 congress will be declared their decision after 4 pm says mallikarjun kharge