पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'हाता'ला हवी आहे... उर्मिला मातोंडकर यांची साथ!

उर्मिला मातोंडकर

पक्षांतर्गत वादामुळे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांनी विधानसभेत पक्षाचा प्रचार करावा, यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत. मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी यासंदर्भात उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा देखील केल्याचे म्हटले आहे.  

चिदंबरम यांच्या पोटात वेदना, तपासणीसाठी रुग्णालयात आणले

उर्मिला आणि त्यांचे कुटुंबिय हे काँग्रेस विचारसरणीला मानणारे आहे. त्यामुळे त्यांना काँग्रेसच्या प्रचाराची मोहिम हाती घ्यावी, अशी विनंती केली आहे. लवकरच त्या आपली भूमिका स्पष्ट करतील, असेही गायवाड यांनी म्हटले आहे. उर्मिला मातोंडकर काँग्रेसला कसा प्रतिसाद देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. लोकसभेच्या निवडणुकीत उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबई मतदार संघातून भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात रिंगणात उतरल्या होत्या. यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

पर्यावरणवाद्यांच्या पदरी निराशा, निर्णयाला स्थगिती देण्यास HCचा

दरम्यान लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर उर्मिला मातोंडकरांनी उत्तर मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत काम केले नसल्याचे पत्र वरिष्ठांना पाठवले होते. मात्र काँग्रेसने त्यांच्या या पत्राला त्यांना अपेक्षित असा प्रतिसाद दिला नाही. त्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पदे दिली जात असल्याची भावना व्यक करुन अखेर उर्मिला मातोंडकर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 Congress want to urmila matondkar participate campaign in Maharashtra