पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभेच्या प्रचारासाठी काँग्रेसने जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी हे दिग्गज उतरणार मैदानात

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ साठी काँग्रेसने शुक्रवारी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत काँग्रेसच्या ४० बड्या दिग्गजांचा समावेश आहे. हे दिग्गज महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये काँग्रेसचा प्रचार करणार आहेत.

NCP च्या माजी खासदाराने घड्याळ काढून बांधले शिवबंधन! 

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस नेता राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी वाड्रा  हे दिग्गज प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. याशिवाय गुलाम नबी आझाद, अहमद पटेल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ या नेत्यांचाही समावेश आहे.  

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकही FIR नाही

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची तयारी आता शिगेला पोहचली आहे. या दोन्ही राज्यातील विधानसभेच्या पार्श्वभूमीवर खासदार राहुल गांधी १० ते १९ ऑक्टोबर दरम्यान दोन्ही राज्यात रोड शो आणि रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये २१ ऑक्टोबरला मतदान होणार असून २४ ऑक्टोबरला निकाल जाही होणार आहे.