काँग्रेसने गुरुवारी रात्री उशीराने १९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीतून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या माजी आमदार आशिष देशमुख यांना तिकीट देण्यात आले आहे. ते नागपूर दक्षिण-पश्चिम मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात उतरतील. यापूर्वी काँग्रेसने १२३ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यादीमध्ये नंदूरबार आणि सिल्लोडच्या उमेदवारांमध्ये बदल केल्याचे पाहायला मिळत आहे.
Congress releases list of 19 candidates for #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/Oq10tscneK
— ANI (@ANI) October 3, 2019
यापूर्वी काँग्रेसने ५१, ५१ आणि २० अशा टप्प्याने उमेदवारांची यादी जाहीर केली होती. चौथ्या यादीतील १९ उमेदवारांसह काँग्रेसने आतापर्यंत १४२ उमेदवारांना मैदानात उतरले आहे. उल्लेखनिय आहे की, राज्याच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने १२५-१२५ जागेवर लढण्याचा फॉर्म्युला निश्चत केला होता. मात्र या फॉर्म्युल्यापेक्षा अधिक उमेदवार काँग्रेसने मैदानात उतरवले आहेत. काँग्रेसच्या या यादीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे तिसरे पुत्र धीरज देशमुख यांना लातूरमधून उमेदावारी देण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणमधून निवडणूक लढणार आहेत. तर सांगलीतून जेष्ठ नेते पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.