पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ये सब खेल हो रहा है, ओवेसींचा आघाडी-शिवसेनेला टोला

असदुद्दीन ओवेसी (ANI)

राज्यातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एमआयएम सु्प्रिमो असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. कोणत्याही परिस्थितीत भाजप किंवा शिवसेनेच्या सरकारला पाठिंबा देणार नसल्याचा पुनरुच्चार केला. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देत असल्यामुळे आपल्याला आनंद होत असल्याचे सांगत जनतेला आता समजेल की कोण कोणाची मते खात होता आणि कोण कोणाच्या मागे आहे, असा टोलाही लगावला. हा सर्व खेळ सुरु असल्याची टीका त्यांनी केली. 

शिवसेना सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत, कपिल सिब्बल मांडणार बाजू

महाराष्ट्रातील राजकीय तिढ्यावर त्यांनी माध्यमांसमोर भाष्य केले. जर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर तुमची काय भूमिका असेल असा सवाल त्यांना केला असता ते म्हणाले की, आधी लग्न होईल, त्यानंतर विचार करु की मुलगा होईल की मुलगी. अजून लग्नही झालेले नाही. त्यामुळे यावर विचार करण्यासारखे काहीच नाही. हा सर्व खेळ सुरु आहे, असा टोला त्यांनी लगावला. 

सावंत यांचा राजीनामा स्वीकारला, जावडेकरांकडे पदभार

दरम्यान, सत्तास्थापनेसाठी वाढीव वेळ देण्यात यावा, ही शिवसेनेची मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाकारल्यानंतर आता शिवसेना या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी २४ तासांचा वेळ दिला होता. तो सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता संपला. आपल्याला आणखी दोन दिवसांचा वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. पण ती नाकारण्यात आली. यानंतर राज्यपालांनी सोमवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन कऱण्यासाठी निमंत्रण दिले. त्यांनाही आता २४ तासांचा वेळ देण्यात आला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 congress ncp and shiv sena playing game in maharashtra says Asaduddin Owaisi AIMIM