पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेतीला गती, उद्योगांना चालना देणारा महाआघाडीचा 'शपथनामा'

शेतीला गती, उद्योगांना चालना देणारा महाआघाडीचा 'शपथनामा' प्रकाशित (HT Photo by Kunal Patil)

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीचा शपथनामा आज (सोमवार) आज प्रसिद्ध झाला. राज्यातील जनतेला दर्जेदार शिक्षण, सर्वोत्तम आरोग्यसुविधा, सुनियोजित शहरे, सुविधायुक्त गावे, पर्यावरणाचे संवर्धन, शेतीला गती, उद्योगांना चालना देणारा हा शपथनामा असल्याचे महाआघाडीच्या वतीने सांगण्यात आले. 

या शपथनाम्यात समृद्ध महाराष्ट्रासाठी, सुरक्षित महाराष्ट्रासाठी, आपत्तीमुक्त महाराष्ट्रासाठी, सुसंवादी महाराष्ट्रासाठी, गतिशील महाराष्ट्रासाठी, सर्वसमावेशक महाराष्ट्रासाठी, अग्रेसर महाराष्ट्रासाठीच्या सर्व मुद्द्यांचा समावेश केल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील जाहीरनामा समितीने हे शपथपत्र तयार केले आहे. 

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार वंदना चव्हाण, अनिल गोटे यांच्यासह महाआघाडीतील घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. 

समाजातील प्रत्येक घटकाचा विकास आणि शाश्वत विकासाच्या दिशेने जाण्याचा निर्धार करणाऱ्या ‘१७ शाश्वत विकास उद्दिष्टांच्या’ अंमलबजावणीसाठी महाआघाडी पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे नेत्यांनी सांगितले. 

शपथनाम्यातील ठळक आश्वासने-

- कामगारांचे किमान वेतन २१ हजार रूपये करणार
- नव्या उद्योगातील ८० टक्के नोकऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना देण्यासाठी विशेष कायदा करणार
- औद्योगिक विजेचा दर अन्य राज्यांशी स्पर्धात्मक ठेवणार
- ठिबक आणि तुषार सिंचनासाठी १०० टक्के अनुदान देणार
- सर्व महापालिकांच्या हद्दीतील ५०० चौरस फुटांपर्यंत घर असलेल्या नागरिकांना मालमत्ता कर माफ करणार
- केजी टू पीजी मोफत शिक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी पहिल्या टप्यात शासकीय आणि अनुदानीत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणार
- शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करणार
- ‘मराठी भाषा सल्लागार समिती’च्या शिफारशीनुसार मराठी ही ज्ञानभाषा बनवण्याच्या उद्देशाने स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार
- तरूण, सुशिक्षित बेरोजगारांना मासिक पाच हजार रुपये भत्ता देणार

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 congress ncp and other parties alliance publish manifesto