पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला १७५ जागा मिळणारः अजित पवार

अजित पवार यांना पत्रकार परिषदेवेळी अश्रू अनावर झाले (फोटो - कुणाल पाटील)

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला १७५ हून अधिक जागा मिळणार असल्याचा दावा माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

ते म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागात प्रचारसभा, मेळावे घेतले जात आहे. या सभांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य नागरिक भाजप सरकारविरोधात पुढे येऊन बोलत आहे. त्यामुळे आघाडीला निश्चितपणे १७५ जागा मिळतील. 

फुशारक्या मारत नाही पण एक लाखाच्या फरकाने मी जिंकेन - अजित पवार

दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. नियोजनशून्य कारभारामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. युवकांना रोजगार नाही, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे, यावर सरकार कधीच बोलताना दिसत नसल्याचे ते म्हणाले. 

निवडणूक कोणाशी लढायची, देवेंद्र फडणवीसांचा सवाल

आगामी विधान निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील अनेक भागात रॅली आणि प्रचार सभा घेण्यात येत आहे. या सर्वाना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि नागरिक भाजप सरकार विरोधात पुढे येऊन बोलत आहे. त्यामुळे या निवडणुकीत आघाडीच्या 175 हून अधिक जागा निवडून येतील. अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली. तर आघाडीतील सर्व नेते मिळून मुख्यमंत्री कोण असणार, या बाबत चा निर्णय घेतला जाईल. असे त्यांनी सांगितले.

निवडणुकीत राज्याचे मुद्दे मांडणे अपेक्षित असताना कलम ३७० सारखा राष्ट्रीय मुद्दा प्रचारात वापरला जात आहे. आमचाही कलम ३७० ला पाठिंबा आहे, हे भाजपच्या नेत्यांनी लक्षात ठेवावे. राज्याचे मुद्दे मांडताना भाजप दिसत नाही, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र आम्हीच घडवणारः उद्धव ठाकरे

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 congress ncp alliance will wins 175 seats says ajit pawar