काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. अपेक्षेप्रमाणे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिणमधून उमेदवारी देण्यात आली आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमधून तर पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातून अरविंद देशमुख यांना तिकीट देण्यात आले आहे.
दबावतंत्राच्या राजकारणाला संपवायचं आहेः शरद पवार
लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कुणाल पाटील यांना धुळे ग्रामीणमधून उमेदवारी देण्यात आली आहे. सांगलीमधून यावेळी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना संधी देण्यात आली आहे.
कैलास गोरंट्याल यांना जालन्यातून तर अजंता यादव यांना कांदिवली पूर्वेतून उमेदवारी देण्यात आली आहे. शिवाजीनगर मतदारसंघातून माजी नगरसेवक दत्तात्रय बहिरट यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे ..
INC COMMUNIQUE
— INC Sandesh (@INCSandesh) October 1, 2019
The Central Election Committee has selected following candidates for the ensuing general elections to the Legislative Assembly of Maharashtra. https://t.co/qkhlFvRno6 pic.twitter.com/KuMZY0dF10