पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी (TWITTER)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) सकाळी केदारनाथला जाऊन दर्शन घेतले. पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर केदारनाथला जाऊन पूजा आणि ध्यान-धारणा केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही विधानसभा निवडणुकीनंतर सपत्नीक केदारनाथला जाऊन दर्शन घेतले. 

'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा

मुख्यमंत्री फडणवीस हे गेल्या काही महिन्यांपासून प्रचारात व्यस्त होते. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यानंतर पुन्हा प्रचारसभेसाठी ते राज्यात फिरले. दि. २१ रोजी मतदान झाल्यानंतर दोन दिवसांच्या कालावधीनंतर म्हणजे दि. २४ रोजी मतमोजणी होणार आहे. या दोन दिवसांत अनेक नेत्यांनी विश्रांती घेतली. फडणवीस यांनीही या कालावधीत केदारनाथला जाण्याला प्राधान्य दिले.

बुधवारी सकाळी त्यांनी केदारनाथचे दर्शन घेतले. फडणवीस यांनी स्वतः टि्वट करत याची माहिती दिली. आज सकाळी केदारनाथचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. हर हर महादेव!, असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले. दर्शन घेतल्यानंतर ते पुन्हा आजच मुंबईत परतणार आहेत.

विधानसभा निवडणूक : मतमोजणीबद्दलची सर्व माहिती एका क्लीकवर

दरम्यान, उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. सर्वच उमेदवारांनी आपले देव पाण्यात ठेवले आहेत. दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.