पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तिसरा विरोधी पक्ष प्रॅक्टिकल विचारांचा, फडणवीसांचा 'मनसे' टोला

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काँग्रेस-राष्ट्रावादीने पराभव अगोदरच मान्य केला असून तिसरा पक्ष प्रॅक्टिकली विचार करत आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा चिमटा काढला. राज्यातील आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील प्रचार सभेत ते बोलत होते. 

मुख्यमंत्री म्हणाले की, निवडणुकीत मजाच येत नाही. या निवडणुकीत काही चुरस दिसत नाही. समोरुन कोणी लढताना दिसत नाही. पाच वर्षांचा मुलगाही महायुतीचे सरकार निवडून येणार हे सांगेल. आता फक्त महायुतीचे २२० जागा येणार की २४० जागेवर यश मिळणार एवढीच चुरस बाकी आहे. कोणताही पक्ष लढताना दिसत नाही. काँग्रेसने पराभव स्वीकारला आहे. राहुल गांधींचा दाखला देत ते म्हणाले की, ते बँकॉकला फिरायला गेल्याचे वृत्त वाचले. कारण त्यांना माहित आहे की, इथं येऊन कितीही डोकं आपटलं तरी काँग्रेसची धुळधाण कोणी थांबवू शकत नाही. शरद पवारांची अवस्थाही वाईट आहे त्यांच्या पक्षात कोण रहायला तयार नाही.   

आमच्यासोबत असताना 'राम' होता, भाजपात गेल्यावर 'रावण' झाला

राज ठाकरे यांच्या मनसेचे नाव न घेता ते पुढे म्हणाले की, एक तिसरा पक्ष मैदानात उतरलाय, हा पक्ष अतिशय प्रॅक्टिकली विचार करणारा आहे. त्यांनी आम्हाला सत्ता द्या म्हटलेच नाही. कारण सत्ता मिळणार नाही हे त्यांना माहित आहे. त्यामुळे त्यांनी सांगितले की, आम्हाला विरोधी पक्षनेतेपद हवे आहे.. याचा अर्थ विरोधी पक्षांची चुरस ही सत्ता मिळवण्यासाठी नाही तर विरोधी पक्षनेता कुणाचा करता येईल यासाठी सुरु आहे, अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला.  

मावळकरांसारखी हिंमत दाखवून रोहित बाबूंच पार्सलही परत पाठवा!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार यांच्या विधानाचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला. आम्ही सगळे थकलो आहोत. आता किती वर्ष लढायचे, असे विधान सुशील कुमार शिंदे यांनी केले. त्यांना भविष्य दिसते आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि मित्र पक्षांना १० टक्के जागा मिळाल्या नाहीत. हिच अवस्था २०१९ मध्ये देखील पाहायला मिळाली. त्यामुळे केंद्रात विरोधी पक्षनेता झाला नाही. जर विरोधी पक्षनेतेपद मिळवायचे असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादी विलीनीकरण केल्याशिवाय पर्याय नाही. यातूनच कदाचित १० टक्के जागा मिळतील, हे सुशील कुमार शिंदे यांना उमगले आहे. १५ वर्षांत आघाडी सरकारने  काहीच केले नाही. जे त्यांना जमले नाही ते गेल्या पाच वर्षांत आम्ही करुन दाखवले आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 cm devendra fadnavis target raj thackeray mns and congress ncp