पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मावळकरांसारखी हिंमत दाखवून रोहित बाबूंच पार्सलही परत पाठवा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आघाडी सरकारला १५ वर्षांत जे जमलं नाही ते आम्ही पाच वर्षात करुन दाखवलं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत जनता त्यांना जागा दाखवेल, अशा भाषेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर तोफ डागली. मावळमधील जनतेने जी ताकद दाखवून पार्थ बाबूला घरी तशीचं हिमंत कर्जत जामखेडकरांमध्ये आहे का? असा प्रश्न विचारत जामखेडमधून बारामतीचे पार्सल परत पाठवा, अशा शब्दांत त्यांनी रोहित पवारांचा पाडाव करण्याचे आवाहन जनतेला केले. नगरमधील सिद्धटेक येथील कर्जत जामखेड मतदार संघातील प्रचार सभेत ते बोलत होते. 

मुंबईत चौथी भाषा आणाल तर याद राखा! पुन्हा मराठीचा मुद्दा..

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, या निवडणुकीचा निकाल सर्वांना माहित आहे. पाच वर्षांच्या मुलाला विचारले तरी तो सांगेल की, सरकार महायुतीचे येणार. निवडणुकीत विरोधकच शिल्लक राहिलेला नसून मजाच उरली नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. काँग्रेस-राष्ट्रवादीला आपला अटळ पराभव दिसत आहे. त्यामुळेच राहुल गांधी बँकॉकला गेले. पवार साहेबांची अवस्थाही 'आधे इधर जावो, आधे उधर जावो.. बाकी मेरे पिछे आओ...' अशी झाली आहे. 

राहुल गांधी मुंबईतील सभेत भाजप-सेनेच्या कारभाराचा पंचनामा

ते पुढे म्हणाले मावळमधील नागरिकांनी हिंमत दाखवली आणि पार्थ बाबूला घरी पाठवलं.  कर्जत-जामखेडच्या नागरिकांमध्ये अशी हिमंत आहे का? तुम्ही रोहित बाबूच पार्सल घरी पाठवणार का? मावळमध्ये जास्त ताकद आहे की कर्जतमध्ये याचा फैसला २४ तारखेला होऊन जाऊद्या! असे म्हणत त्यांनी भाजपचे उमेदवार राम शिंदे यांना प्रचंड मतांनी निवडून आणा, असे आवाहन जनतेला केले. आमचा रामभाऊ कलाकार आहे. तो हार माणणारा नाही. कितीही मोठा पैलवान आला तरी रामभाऊ समोरच्याला सोडत नाही, असे शब्दांत मुख्यमंत्र्यांनी प्राध्यापक आणि विद्यमान मंत्री राम शिंदे यांचे कौतुक केले. नेतृत्व थोपवणाऱ्यांना जनता स्वीकारणार नाही, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीला लगावला.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 cm devendra fadnavis target on rohit pawar karjat jamkhed constituency