पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेंबडं पोरंही सांगेल राज्यात महायुतीचंच सरकार येणारः फडणवीस

देवेंद्र फडणवीस

मी महायुती सरकारच्या पाच वर्षांचा हिशोब देतो, तुम्ही १५ वर्षांच्या कामाचा हिशोब द्या, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला दिले आहे. कणकवली येथे भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. कणकवलीत नितेश राणे यांना ६५ ते ७० टक्के मिळतील असा दावा करत शेंबडं पोरंही राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येईल हे सांगेल, असा टोलाही त्यांनी लगावला. 

उरलेले आयुष्य कोकणाच्या विकासासाठी घालवणार: नारायण राणे

कणकवलीसह राज्यात कुठेच चुरस नाही. आपण जिंकणारे लोक आहोत, असे म्हणत फडणवीस यांनी महायुतीच्या विजयाचा दावा केला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराबाबत काही भाष्य केले नाही. या मतदारसंघात भाजपच्या नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेने सावंत यांनी उमेदवारी दिली आहे. पण फडणवीस यांनी सर्व विरोधकांनी मिळून ३५ टक्केच मते मिळतील, असे भाकीत करुन विरोधी उमेदवाराची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.

मी कसा काय विरोध करू शकतो? - शरद पवार

फडणवीस पुढे म्हणाले, महायुती सरकारने आधीच्या सरकारपेक्षा जास्त काम केले आहे. जनता पंतप्रधान मोदींसोबत आहे. मागील पाच वर्षे महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले, २० हजार कोटींची मदत केली. इथल्या युवकांना इथेच काम मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. इथला युवक मुंबईला येण्याची गरज पडणार नाही. आघाडी सरकारने काहीच केले नाही. मी पाच वर्षांच्या कामाचा हिशोब देतो. आघाडी सरकारने १५ वर्षांचा हिशोब द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी फडणवीस यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेबाबतही सांगितले. 

मुर्शिदाबाद तिहेरी हत्याकांडः विम्याच्या पावतीवरुन तिघांचा खून

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 cm devendra fadnavis speech in kankavli for nitesh rane election campaign