पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'नटरंग'सारखे हातवारे आम्हाला करता येत नाही, फडणवीसांचा पवारांना टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी वैराग येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केलेल्या टीकेवेळी आक्षेपार्ह हातवारे केले होते. पवारांच्या या कृतीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. पराभव समोर दिसायला लागला की माणसाची विवेक बुद्धी हरपायला लागते, उत्तर तर आम्हाला ही देता येते, पण नटरंग सारखे हातवारे आम्हाला करता येत नाही, असा टोला लगावताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

'दिवाळीपूर्वी भाजप सरकारचं दिवाळं काढा'

जळगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना फडणवीस यांनी शरद पवारांच्या टीकेचा समाचार घेतला. 

'शरद पवारांची स्थिती राहुल गांधी यांच्यापेक्षा वाईट झाली आहे. पवारांच्या पक्षात रहायला सध्या कोणीही तयार नाही अशी अवस्था झाली आहे', असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसंच, यावेळी त्यांनी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवर आणि पवारांच्या हातवाऱ्यावर टीका केली. 'पराभव समोर दिसू लागला की माणसाची विवेकबुध्दी कमी होऊ लागते. आम्ही नटरंगसारखे काम करत नाही. अशाप्रकारे हातवारे आम्ही करु शकत नाही', असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जगात सर्वांधिक सुखी मुसलमान भारतात, कारण..: मोहन भागवत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 cm devendra fadnavis slams on ncp chief sharad pawar in jalgaon