पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आम्ही ज्यांना नाकारले तेवढेच पवारांसोबत : CM फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या प्रचारसभेत पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. काल परवा पवार साहेब म्हणाले मी कुस्ती परिषदेचा अध्यक्ष आहे. मी अनेक पैलवान तयार केले. हो पवार साहेब तुम्ही अनेक पैलवान तयार केले आणि ते एकमेकांशी भांडून तुम्हाला सोडून गेले. त्यातला एकही पैलवान तुमच्यासोबत नाही. त्यामुळे या वयात तुम्हाला मतासाठी फिरण्याची वेळ आली आहे. पैलवान तयार करुन उपयोग काय? असा सवाल त्यांनी शरद पवारांना विचारला आहे.

मुंबई मेट्रो मराठी माणसासाठी धोक्याची : राज ठाकरे

सध्याच्या घडीला राष्ट्रवादीमध्ये असलेले काही लोकही आमच्या संपर्कात होते. पण आम्ही त्यांना जागा दिली नाही. तेवढेच लोक आता पवारांसोबत आहेत, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था वाईट आहे. जाहीरनामा पाहिल्यानंतर ते सत्तेत येणार नाहीत हे स्पष्ट दिसते आहे. सत्ता मिळाली तर प्रत्येकाला एक ताजमहाल बांधून देऊ आणि चंद्रावर प्लॉट देऊ एवढेच त्यांनी आपल्या जाहीरनाम्यातून सांगितले नाही, असा उपरोक्ती टोलाही त्यांनी लगावला.

पुणे देशाला संस्कारही देते आणि स्टार्टअपही : PM मोदी

आपल्या सरकारबद्दल ते म्हणाले की, सर्व समस्या संपल्या असा दावा मी करत नाही. पाच वर्षांत सर्व गोष्टी होणार नाहीत. पण काँग्रेस-राष्ट्रवादीने मागील १५ वर्षांचा हिशोब द्यावा. मी देखील ५ वर्षांचा हिशोब देतो. जर त्यांच्यापेक्षा चांगले काम करुन दाखवले नसेल तर मत मागणार नाही. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ४२ जागा मिळाल्या होत्या मात्र यंदाच्या निवडणूकीत २१ जागाही मिळणार नाहीत. राहुल गांधींना याची कल्पना असल्यामुळेच ते बँकॉकला फिरायला गेले होते, असा टोमणाही त्यांनी मारला.