पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माघार घेतली नाही तर जागा दाखवू, मुख्यमंत्र्यांचा बंडखोरांना इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पत्रकाद्वारे महायुतीची घोषणा केल्यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदे घेत महायुतीची अधिकृत घोषणा केली. महायुती प्रचंड मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

शरद पवारांचे नातू रोहित पवारांची संपत्ती ६५ कोटी

हिंदुत्वाच्या धाग्यावर लोकसभा आणि विधानसभा एकत्रित लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. युतीसाठी आम्ही अनेक जागांवर तडजोड केली. भाजप-शिवसेनेसह मित्रपक्षांच्या सहकार्याने महायुतीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. युतीचा फॉर्म्युला काय? असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत होता. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर अखेर भाष्य केले. भाजप १५०, शिवसेना १२४ तर मित्र पक्षांना १४ जागा सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मित्र पक्षातील काही उमेदवार कमळाच्या चिन्हावर मैदानात उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात राष्ट्रवादीकडून उमेदवारी

तिकीट न मिळाल्याने अनेक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटल्याचे पाहायला मिळाले. काहींनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केली असून यासाठी अर्ज देखील दाखल केला आहे. या बंडखोर नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी सूचक इशारा दिला आहे. ज्यांनी बंडखोरी करुन अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे त्यांना पुढील दोन दिवसांत अर्ज मागे घेण्यासाठी आवाहन करणार आहोत. त्यांनी ऐकले तर ठिक अन्यथा महायुती त्यांना जागा दाखवेल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

भाजपच्या काही दिग्गज नेत्यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, कोणाचेही तिकीट कापण्यात आलेले नाही. आम्ही फक्त जबाबदाऱ्या बदलल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी महायुतीचा जागा वाटपाचा फार्म्युला स्पष्ट केला. भाजप १५०, शिवसेना १२४ तर मित्र पक्षांना १४ जागा सोडण्यात आल्याचे ते म्हणाले    

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 cm devendra fadnavis and Uddhav Thackeray bjp shivsena Mahayuti