पिंपरी-चिंचवड येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आलेल्या राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेत गोंधळ घालण्यात आला. यामुळे काही काळ सभेच्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पंकजा मुंडे बोलत असताना पाच ते सहा जणांनी अचानक घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ सभेत बाधा निर्माण झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी पाच ते सहा जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर सभा पुर्ववत सुरु झाली. घोषणा देणारे लोक हे रिंगरोड बाधित असल्याचे सांगण्यात येते.
'नटरंग'सारखे हातवारे आम्हाला करता येत नाही, फडणवीसांचा पवारांना टोला
चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून लक्ष्मण जगताप हे निवडणुकीस उभे आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. पंकजा मुंडे या भाषणासाठी उभ्या राहिल्या. त्यांनी भाषण सुरु केल्यानंतर पाचच मिनिटांत रिंगरोड बाधित काही नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पंकजा मुंडे यांनी संबंधिताना शांत राहण्याचे आवाहन केले. हे राष्ट्रवादीचे जुने धंदे असल्याचा आरोप त्यांनी केला.
गडकिल्ल्यांवर 'छमछम'ची व्यवस्था करणार का ?, पवारांचा सवाल
पंकजा मुंडे म्हणाल्या की, राष्ट्रवादी ने सिद्ध केले की, ते निवडणूक हरलेले आहेत. ज्या ठिकाणी हजारो लोक बसले आहेत. तिथे एक व्यक्ती उभा करून बोलवण्याचे हे त्यांचे धंदे जुने आहेत. हे जनता खपवून घेणार नाही. माझ्या सभांमध्ये लोक पाठवून बदनामी करण्याचा प्रयत्न करता. अशा प्रकाराला मुंडे साहेबांचे सैनिक घाबरत नाहीत. निवडणुकांपर्यंत आपला संयम सोडायचा नाही अस त्या म्हणाल्या.