पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भविष्यात काँग्रेसने शिवसेनेशी युती करुन निवडणूक लढवायची का?, निरुपम यांचा सवाल

संजय निरुपम

राज्यात शिवसेनेला पाठिंबा द्यावा की नाही यावर दिल्लीत काँग्रेसच्या श्रेष्ठींमध्ये खलबते सुरु आहेत. परंतु, मुंबईत काँग्रेस नेते माजी खासदार संजय निरुपम यांनी मात्र शिवसेनेबरोबर काँग्रेसने जाऊच नये असा पवित्रा घेतला आहे. रविवारीही त्यांनी याबाबत ठाम भूमिका घेतली होती. सोमवारी त्यांनी आता आपल्या पक्षालाच सवाल केला आहे. भविष्यात काँग्रेसने शिवसेनेशी युती करुन निवडणूक लढवायची का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर त्यांनी मध्यावधीची शक्यताही वर्तवली आहे. 

शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात शरद पवार यांनी केले महत्त्वाचे विधान...

सरकार कोण आणि कसे स्थापन करेल माहीत नाही? पण महाराष्ट्रातील सध्याची अस्थिरता संपायला हवी. निवडणुकीला सर्वांनी तयार राहावे. कदाचित पुढच्या वर्षी म्हणजे २०२० ला मध्यावधी निवडणुका होणार, असे टि्वट निरुपम यांनी केले आहे. 

राज्यपालांकडून दुजाभाव, भाजपला ७२ तर आम्हाला फक्त २४ तासः संजय राऊत

तत्पूर्वी, रविवारीही त्यांनी हीच भूमिका मांडली होती. शिवसेना-काँग्रेस मिळून स्थिर सरकार महाराष्ट्रात शक्य नाही. काँग्रेसने शिवसेनेला साथ दिली तर भविष्यात काँग्रेसला अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यामुळेच काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेसोबत जाऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.

..तरच शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये चर्चा होऊ शकते : नवाब मलिक

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 Can we contest future elections with Shiv Sena as ally asks Congress Sanjay Nirupam