पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात हुकूमशाही आणण्याचा भाजपचा डाव हाणून पाडा: सुशीलकुमार शिंदे

सुशीलकुमार शिंदे

केंद्रातील भाजप सरकार रोजगारासह अनेक आश्‍वासनांची पूर्तता न करता केवळ बढाया मारण्याचे काम करत आहे. नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून विकासदरही कमी झाला आहे. ३७० कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये या सरकारने एकप्रकारे अघोषित आणीबाणीच लादलेली आहे. हे लक्षात घेता या सरकारला देशात हुकूमशाही आणायची आहे. तेव्हा जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवून हुकूमशाहीचा डाव हाणून पाडावा, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. सोलापूर येथे त्यांची कन्या आणि सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

स्वतः थकल्यामुळेच सुशीलकुमार शिंदेंचं 'ते' वक्तव्यः अजित पवार

याप्रसंगी सुशीलकुमार शिंदे यांनी शहर मध्यमधील शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, ज्यांना कॉंग्रेसने आमदार केले, बाजार समितीचे सभापतीपद देऊ केले. एवढेच नव्हे यंदाच्या निवडणुकीत दक्षिण सोलापूरमधून उमेदवारी देण्याची तयारी ठेवली. पण त्यांच्यात हिम्मत नसल्याने ते मतदारसंघ सोडून पळून गेले. काँग्रेस हा सर्वधर्मसमभाव मानणारा आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येऊन लढल्यास विरोधी पक्षांचा निभाव लागणार नाही, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे पाच वर्षे झोपले होते का?, अजित पवार यांचा सवाल

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 bjp trying to rule as a dictatorship destroyed their intentions says sushilkumar shinde