पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरकारबद्दल भाजप-शिवसेनेला विचारा, शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ

शरद पवार (ANI)

राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेत येणार असे बोलले जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. हिवाळी अधिवेशनासाठी दिल्लीत दाखल झालेले शरद पवार हे महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसंदर्भात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता पवारांनी याबाबत भाजप-शिवसेनेला विचारा असे म्हणत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 

मुंबईमध्ये महापौरपदासाठी भाजप उमेदवार देणार नाही

भाजप-शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवली होती. त्यांना त्यांचा मार्ग निवडायचा आहे. आम्ही आमचे राजकारण करु, असे स्पष्ट वक्तव्य पवार यांनी केले. 

राज्यात शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्याबाबत पवार हे सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी पवारांनी असे वक्तव्य केल्यामुळे उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे. 

विरोधी बाकावर बसताच सेना आक्रमक, पहिल्याच दिवशी संसदेबाहेर निदर्शने

दरम्यान, राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भात अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सत्ता स्थापन करणार असले, तरी त्यांच्यातील चर्चेला अद्याप अंतिम रूप मिळालेले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्त लांबणीवर पडला आहे. उद्धव ठाकरे या महिन्यात २४ तारखेला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती होती. पण त्याचवेळी खुद्द उद्धव ठाकरे यांनी अद्याप तारीख निश्चित झालेली नसल्याचे म्हटले होते.

पुण्यात महापौरपदासाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 bjp shiv sena fought together theay have to choose their path says ncp leader sharad pawar