पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

युतीही होणार आणि शिवसेनेचा मुख्यमंत्रीहीः उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

शिवसेना ही न्यायहक्कासाठी लढणारी आहे. गेली ५ वर्षे आपल्या आयुष्यात खूप मोलाची होती. चुकीच्या गोष्टींवर घाव घालण्याचे काम शिवसेनेने केले. अन्यायाविरोधात आवाज उठवला. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणारच पण त्यापुढे जाऊन त्यांना चिंतामुक्त करायचे आहे. त्यामुळे मला सत्ता हवी आहे. कोणत्याही परिस्थितीत मला सत्ता हवी आहे. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वचन दिले आहे. एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे वचन त्यांना दिले आहे. माझे स्वप्न, वचन आणि शपथ आहे..मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवेनच, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केला. तसेच भाजपबरोबर आपली युती होईल. त्याची घोषणा एक-दोन दिवसांत होईल, असे सांगत त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी युती होणार असल्याचे शिक्कामोर्तब केले. 

राजीनामा देण्यापूर्वी अजित पवारांची मुलाशी चर्चा पण माझ्याशी नाही - शरद पवार

मुंबईत रंगशारदा येथे आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांसह २८८ मतदारसंघातील इच्छुकही उपस्थित होते.

ते म्हणाले, युतीबाबत कोणी काही बोलू देत. माझी आणि अमित शहांशी योग्य दिशेने बोलणी चालू आहेत. एकदा युती केली तर पाठीमागून खंजीर खुपसणाऱ्यांची औलाद नाही. आम्ही शक्यता पडताळून पाहत आहोत.

तिकीट वाटप राहू द्या, आधी पुण्यातील स्थिती हाताळा; छगन भुजबळांचा टोला

शिवसेनेची २८८ जागांसाठी तयारी झाली आहे. मला प्रत्येक ठिकाणी शिवसेना हवी आहे. प्रत्येक घरात, प्रत्येक गावात शिवसेना हवी आहे. जिथे भाजपची जागा आहे, तिथे शिवसेना त्यांच्या मदतीला येईन. दोघांनी मिळून सत्ता राबवायची असेल तर तिथे खेचाखेची करुन चालणार नाही. जागावाटप आज-उद्या होईलच, सर्व अंतिम टप्प्यात आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 bjp shiv sena comes together for election says uddhav thackeray confirms alliance