पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाराष्ट्र आम्हीच घडवणारः उद्धव ठाकरे

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे

विरोधकांना ६० वर्षे देऊनही महाराष्ट्र असा तडपडतच आहे. त्यांना आता भूमिपूत्र आणि बेकारी काय असते समजली आहे. बेरोजगारांना रोजगाराची संधी युती सरकारच देणार, असा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संगमनेर येथील जाहीर सभेत व्यक्त केला. आजचा महाराष्ट्र आम्ही घडवणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला. 

संगमनेर येथून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे निवडणुकीस उभे आहेत. तेथून शिवसेनेचे साहेबराव नवले हे महायुतीचे उमेदवार आहेत. उद्धव ठाकरे यांनी यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर टीकास्त्र सोडले.

शेतकरी उगीच आत्महत्या करत नाहीत, शरद पवार यांचे सूचक वक्तव्य

उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे हेही मंचावर उपस्थितीत होते. यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी तेजस फक्त माझ्याबरोबर सभा पाहायला आलाय. तो जंगलात रमणारा माणूस आहे, असा खुलासा भाषणाच्या सुरुवातीलाच केला.

ते थोरात आणि आम्ही जोमात, असा टोलाही त्यांनी लगावला. थोरात साहेबांचा नेता बँकाकला पोहोचला आहे. तुम्हाला आता घरी जायला हरकत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

काँग्रेस पक्ष स्वतःची ओळख विसरलाय, राधाकृष्ण विखेंची टीका

बाजीप्रभू देशपांडेंबाबत थोरात यांनी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. नगर जिल्ह्याचा १२-० असा निकाल लागेल. बेरोजगारांना युती सरकारच संधी देईल, असे ते म्हणाले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 bjp shiv sena alliance will built todays maharashtra says uddhav thackeray in sangmner