पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सावरकर, सावित्रीबाई फुलेंना 'भारतरत्न'साठी प्रयत्न करणार, भाजपचा शब्द

सावरकर, सावित्रीबाई फुलेंना 'भारतरत्न'साठी प्रयत्न करणार, भाजपचा शब्द

भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज (मंगळवार) संकल्प पत्र (जाहीरनामा) प्रसिद्ध केला आहे. स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर (वीर सावरकर) यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे आश्वासन भाजपने प्रामुख्याने दिले आहे. महाराष्ट्रात भाजप आणि त्यांचा सहकारी पक्ष शिवसेना दीर्घ काळापासून सावरकर यांना भारतरत्न मिळण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. भाजपने आपल्या संकल्प पत्रात सावरकर यांच्याशिवाय सावित्रीबाई फुले यांनाही भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले आहे. 

भाजपचा 'दुष्काळमुक्त महाराष्ट्र'चा संकल्प

लोकसभा निवडणुकीपाठोपाठ भाजप आणि शिवसेनेची विधानसभेसाठीही युती झाली आहे. तरीही दोन्ही पक्षांनी वेगवेगळे जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. याआधी शिवसेनेने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आता भाजपनेही आपले संकल्प पत्र जाहीर केले आहे. आपल्या संकल्प पत्रात अनेक लोकानुनयी आश्वासने भाजपने दिली आहेत. सावरकर आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याबरोबरच भाजपने आरोग्य आणि शिक्षणावर जोर दिला आहे. त्याचबरोबर समाजातील सर्व वर्गाला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपवाले शिवसेनेची रोज इज्जत काढताहेत, राज ठाकरेंचा वर्मी घाव

भाजपने आपल्या संकल्प पत्रात शेतकरी आणि युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांना १२ तास वीज, युवकांना एक कोटी रोजगार, भारत नेट आणि महाराष्ट्र नेटच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र इंटरनेटने जोडणार असल्याचे आश्वासनांचा संकल्प पत्रात समावेश आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 BJP Maha Sankalp Patra publish assurance for bharat ratna to sawarkar savitribai phule