पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तिढा सुटणार? सेनेशी मिळतंजुळतं घेण्यासाठी भाजपचा नवा फॉर्म्युला

राजकीय संघर्ष टळणार? सेनेशी मिळतंजुळतं घेण्यासाठी भाजपचा नवा फॉर्म्युला

महाराष्ट्रात अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पदाच्या मागणीवर अडून बसलेल्या शिवसेनेचे समाधान करण्यासाठी भाजप आता एक नवा फॉर्म्युला आणण्याचा विचार करत आहे. त्या अंतर्गत राज्यात उपमुख्यमंत्री पदाबरोबर केंद्र सरकारमध्ये शिवसेनेला आणखी दोन मंत्रिपदे दिली जाऊ शकतात. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून दोन्ही पक्षांकडून केल्या जात असलेल्या वक्तव्यामुळे सरकार स्थापन करण्यास उशीर होऊ शकतो.

'मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याने शिवसेनेकडून बैठक रद्द'

भाजप-शिवसेनेकडून मंगळवारी दिवसभर एकमेकांना डिवचणारी वक्तव्ये केली जात होती. सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा ५०-५० फॉर्म्युला ठरलाच नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर शिवसेनेने सरकार स्थापनेनिमित्त आयोजित भाजपबरोबरील बैठकच रद्द केली.

..ही तर विनाशकारी विपरित बुद्धी, मुनगंटीवारांची सेनेवर टीका

विधानसभा निवडणुकीचा निकाल येऊन पाच दिवस झाल्यानंतरही भाजप-शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र येण्यात यशस्वी ठरले नाहीत. शिवसेना सातत्याने भाजपवर दबाव आणण्यात आणि सुरुवातीला संयम बाळगणाऱ्या भाजनेपही आता शाब्दिक युद्धात उडी घेतली आहे.

केंद्र व राज्यात हिस्सेदारी वाढवण्यावर मंथन

शिवसेनेचे समाधान करण्यासाठी भाजप राज्य व केंद्रातील त्यांची हिस्सेदारी वाढवण्याचा प्रस्ताव देऊ शकतो. केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला दोन मंत्रिपद दिले जाऊ शकते. त्याचबरोबर राज्यात उपमुख्यमंत्री पदाशिवाय सरकारमध्ये ४० टक्के हिस्सा देण्याचा प्रस्ताव दिला जाऊ शकतो. भाजपचा हा सर्वांत मोठा समजोता फार्म्युला असल्याचे मानले जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाहीः संजय राऊत

राष्ट्रवादी आणि काँग्रेसवरही नजर

विधानसभेच्या आकडेवारीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. शिवसेनेकडे दोन पर्याय आहेत. एक तर त्यांनी भाजपबरोबर सरकार बनवावे किंवा राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर नवा पर्याय उभा करु शकतात. भाजपकडेही शिवसेनेला दूर केल्यानंतर राष्ट्रवादी हा सर्वांत मोठा पर्याय आहे.

गणित काय सांगतंय

शिवसेनेचे ४५ आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, संजय काकडेंचा दावा

विधानसभेत २८८ जागा आहेत. भाजपला १०५, शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५४ तर काँग्रेसकडे ४४ जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा हा १४५ आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 BJP is Planning on New formula to Resolve tussle with Shiv Sena Maharashtra