पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निकालाआधीच भाजपची सेलिब्रेशनची तयारी

भाजप

विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर होणार आहेत. पण त्यापूर्वीच भाजपने मुंबईमध्ये सेलिब्रेशनची तयारी सुरू केली आहे. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयाकडून पाच हजार किलो लाडूंची ऑर्डर देण्यात आली असून, दुसरीकडे भाजपच्या काही उमेदवारांचे विजयाचे बॅनरही त्यांच्या मतदारसंघात लागले आहेत. याआधीही लोकसभा निवडणुकीवेळी भाजपकडून निकाल जाहीर होण्याआधीच प्रदेश कार्यालयाबाहेर विद्युत रोषणाई करण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते.

गेल्या सोमवारी मतदान झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार आहे. गुरुवारी दुपारपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले असेल. पण त्यापूर्वीच भाजपच्या अनेक नेत्यांच्या विजयाचे बॅनर्स त्यांच्या मतदारसंघामध्ये लागले आहेत. कोथरूड मतदारसंघामधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघातून त्यांच्या विजयाचे बॅनरही काही जणांनी लावले आहेत. 

भाजपच्या प्रदेश कार्यालयात गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व मोठे नेते येणार आहेत. त्यावेळी या ठिकाणी आणखी मोठा जल्लोष करण्यात येईल, अशी माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्याने दिले.