शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची या सरकारची इच्छा नाही. मात्र देशाचे अर्थमंत्री ८० हजार कोटींची गुंतवणूक कॉर्पोरेट क्षेत्रात करण्याचा निर्णय घेतात. याचा अर्थ या सरकारला शेतकऱ्यांची फिकीर नाही, फक्त उद्योगपतींची काळजी आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाशिम जिल्ह्यातील प्रचारसभेत केली.
देशात हुकूमशाही आणण्याचा भाजपचा डाव हाणून पाडा: सुशीलकुमार शिंदे
वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघातील उमेदवार प्रकाश डहाके, रिसोड (वाशिम) येथील काँग्रेसचे उमेदवार अमित झनक आणि वाशिमच्या उमेदवार रजनी राठोड यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत उपस्थितांना त्यांनी संबोधित केले.
सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचं आश्वासन भाजपा सरकारने दिलं होतृं. मात्र सत्तेत येताच केवळ ३१% शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली, मग बाकी ६९% शेतकऱ्यांचा विचार हे सरकार कधी करणार? याचे उत्तर देण्याची ताकद या सरकारमध्ये नाही. pic.twitter.com/H6haf1l4NY
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 9, 2019
ते म्हणाले, उत्तर प्रदेशमधील भाजपा नेत्याने एका मुलीवर अत्याचार केला. भाजपा सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेऊन आम्ही सत्तेत आलो असे भाजपा सरकार सांगते, मग हे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठिशी कसे घालते?, असा सवाल केला.
स्वतः थकल्यामुळेच सुशीलकुमार शिंदेंचं 'ते' वक्तव्यः अजित पवार
सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचं आश्वासन भाजपा सरकारने दिलं होतृं. मात्र सत्तेत येताच केवळ ३१% शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली, मग बाकी ६९% शेतकऱ्यांचा विचार हे सरकार कधी करणार? याचे उत्तर देण्याची ताकद या सरकारमध्ये नाही, असेही ते म्हणाले.