पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपने मला धोका दिला, तरीही आम्ही महायुतीसोबतः महादेव जानकर

महादेव जानकर

भाजपने माझ्या पक्षाला धोका दिला आहे, असा आरोप राष्टीय समाज पक्षाचे अध्यक्ष दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला आहे. भाजपने जरी धोका दिला असला तरी रासप महायुतीबरोबर असेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. महायुतीतील मित्रपक्षांबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य बरोबर असल्याचेही त्यांनी म्हटले. त्याचबरोबर गंगाखेडची एकमेव जागा रासप स्वतःच्या निवडणूक चिन्हावर लढवणार असल्याचे सांगत भाजपने दौंड आणि जिंतूरमधून जे उमेदवार रासपचे असल्याचे सांगितले आहेत. त्यांचा रासपशी काहीच संबंध नसून ते भाजपनेच जाहीर केलेले उमेदवार असल्याचे स्पष्ट केले आहे. जानकर यांच्या या भूमिकेमुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येते. 

पुन्हा सत्ता मिळवण्यासाठीच जागावाटपात भाजपशी तडजोड - उद्धव ठाकरे

महादेव जानकर हे पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, महायुतीत गंगाखेड ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेलेली आहे. तिथे शिवसेनेचा उमेदवार उभा आहे. पण मी भाजप आणि शिवसेनेला त्यांचा उमेदवार मागे घेण्याची विनंती करत आहे. भाजपने दौंड आणि जिंतूरमधून रासपचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यांना भाजपने ए, बी फॉर्म दिले आहेत. त्यामुळे त्या उमेदवारांचा रासपशी काही संबंध नाही. ते भाजपचे उमेदवार आहेत. जिंतूर आणि दौंडबाबत कार्यकर्तेच निर्णय घेतील. गंगाखेड येथेच रासपचा अधिकृत उमेदवार आहे. तिथे रत्नाकर गुट्टे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

फुशारक्या मारत नाही पण एक लाखाच्या फरकाने मी जिंकेन - अजित पवार

भाजपने महायुतीतील घटक पक्षांना जागा दाखवल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. त्यांच्या या वक्तव्याला जानकर यांनी दुजोरा दर्शवला. उद्धव ठाकरे हे सत्य तेच बोलले. महायुतीतील काही जागा वगळता घटक पक्षांचे उमेदवार हे भाजपनेच जाहीर केले असून ते भाजपचेच उमेदवार असल्याचे ते म्हणाले. भाजपने रासपला धोका दिला असला तरी आम्ही महायुतीसोबत राहू याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

तिकीट का मिळाले नाही याचे आत्मपरीक्षण करतोय - विनोद तावडे

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 bjp cheat with rsp but we are with mahayuti says mahadev jankar