पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मतदानाला जाताय.. मग यापैकी एक ओळखपत्र जवळ ठेवाच

मतदान ओळखपत्र

महिनाभराचा प्रचार शनिवारी संपुष्टात आल्यानंतर आता सर्वांनाच मतदानाचे वेध लागले आहेत. परंतु, या उत्साहावर पावसाचेही सावट आहे. हवामान विभागाने काही ठिकाणी मुसळधार, अति मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात याचा मतदानावर किती परिणाम होईल हे सोमवारीच स्पष्ट होईल. पावसातही प्रशासन सज्ज झाले आहे. उमेदवारही तयार आहेत. पण मतदारांनो तुम्ही तयार आहात का ? म्हणजे मतदानासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे तुमच्याकडे आहेत का ?, म्हणजे ऐनवेळी मतदान केंद्रावर गेल्यानंतर आपल्याकडे ओळखपत्र नाही किंवा जे आहे ते चालते की नाही याची माहिती नाही. असा गोंधळ उडू नये म्हणून आम्ही तुम्हाला ओळखपत्रासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादीच देत आहोत. मतदानाला निघण्यापूर्वी यापैकी आपल्याकडे ओळखपत्र आहे की नाही याची खात्री करुन निघा. 

विधानसभा निवडणूक २०१९: असे शोधा मतदार यादीत नाव, मतदान केंद्र

मतदान छायाचित्र ओळखपत्र असेल तर काहीच अडचण नाही. पण ते जर नसेल तर खाली दिलेल्या ओळखपत्रापैकी एकाचा ओळखपत्र म्हणून वापर करता येईल.

१. पासपोर्ट
२. वाहन चालक परवाना
३. छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/ सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र)
४. छायाचित्र असलेले बँक/ पोस्टाचे पासबुक
५. पॅनकार्ड
६. एनपीआर अंतर्गत आरजीआयद्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड
७. मनरेगा कार्यपत्रिका
८. कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
९. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्ताऐवज
१०. खासदार/आमदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
११. आधारकार्ड

विधानसभा निवडणूक: उद्याच्या मतदानावर पावसाचे सावट

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 before voting ensure to have valid electors photo identity card or alternative identity card