पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सातारा : भाजप उमेदवार मदन भोसले यांच्या गाडीवर हल्ला

भाजप उमेदवाराच्या कारच्या काचा फोडण्यात आल्या

वाई विधानसभेतील भाजपचे उमेदवार मदन भोसले यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. वाई येथील फुले नगर परिसरात त्यांच्या गाडीवर हल्ला कलण्यात आला. हॉकी स्टिक घेऊन आलेल्या काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी मदन भोसले गाडीमध्ये होते. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  

Rain : कोल्हापूर, साताऱ्यासह राज्यात ठिकठिकाणी मुसळधार

सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी त्यापैकी ५ जागा एकट्या राष्ट्रवादीकडे, २ काँग्रेसकडे आणि २ शिवसेनेकडे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पाठ केल्याने यंदाच्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघाच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत.

विधानसभा निवडणूक २०१९: असे शोधा मतदार यादीत नाव, मतदान केंद्र 

उल्लेखनिय आहे की, वाई मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात काँग्रेसला रामराम करुन भाजपवासी झालेले मदन भोसले यांना उमेदवारी देण्यात आली होती.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 attack on wai constituency bjp candidate madan bhosale van in satara